कंडारीच्या ग्रामविकास अधिकारीपदी प्रशांत तायडे रुजू

prashant tayde niyukti

भुसावळ प्रतिनिधी । शहराला लागूनच असणार्‍या कंडारी गावाच्या ग्रामविकास अधिकारीपदी प्रशांत आर. तायडे रूजू झाले असून यामुळे विकासाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गत अनेक दिवसांपासून कंडारी ग्रामपंचायत सातत्याने चर्चेत आहे. संवेदनशील गाव अशी ओळख असल्यामुळे येथे कुणीही ग्रामविकास अधिकारी टिकत नाही. या पार्श्‍वभूमिवर येथीलच रहिवासी असणार्‍या प्रशांत आर. तायडे यांची येथील ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी येथे आधीही याच पदावर काम केले असल्यामुळे त्यांच्या पुनर्नियुक्तीचे स्वागत केले जात आहे.

नदी उशाला कोरड घशाला अशीच कंडारी गावाची ओळख निर्माण झाली आहे. शहरा लगतची तालुक्यातील सर्वात जास्त लोकवस्तीची ग्रा.प. म्हणून कंडारीची ओळख आहे. निमशहरी औद्योगिक वसाहतीचा मोठ्या प्रमाणावर समावेश असलेली ग्रा.प. म्हणून कंडारीची ओळख आहे. परंतु अंतर्गत राजकारण आणि प्रशासकीय यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे गांवच्या विकासाला खीळ बसली आहे. मागचा अनुभव लक्षात घेता निलंबीत झालेल्या ग्रा.वि.अ. यांचे वरील कारवाईचे प्रमाण लक्षात घेता कुणीही ग्रा.वि.अ. कुणीही कायमस्वरुपी काम करण्यास भिती पोटी धजावत नाहीत. प्रत्येकाने नाईलाज म्हणून दोन-दोन महीने ग्रा.प. कारभार पाहायचा असाच काहीसा अलीखीत नियम ग्रामसेवकांनी करुन घेतला आहे. यामुळे प्रशासनाने प्रशांत तायडे यांच्याकडे पदाची सूत्रे सोपविली आहेत. त्यांच्या काळात केलेली विकास कामे केली असून बेघरांना घरे मंजूर केली आहेत. १३ वा वित्त अयोगाचा परत जाणारा निधी तायडे यांनी खर्ची घालत लोकांच्या मनात आदर निर्माण केला आहे. आता ग्रा.प. कडे विशेष दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गतचा चार कोटी च्या वर विकास निधी मंजूर झाला आहे. प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेच्या २१ कोटी च्या प्रारुप कामाला ही अंतिम मंजूरी मिळविणेे यासह १४ वा वित्त अयोगातील एक कोटी च्या आसपास पडून असलेल्या निधी अंतर्गत कामांना चालना देणे, बेघर धारकांचे घरकुल प्रस्तावांना मंजूरी देणे यासह अन्य कामांना गती देण्याचे काम प्रशांत तायडे यांच्याकडून अपेक्षित आहे.

प्रशांत तायडे यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे. सरपंच सौ. योगिता ताई शिंगारे, उपसरपंच विशाल खेळकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते सरजू तायडे आदींनी नवनियुक्त ग्रा.वि.अ. प्रशांत तायडे यांचे ग्रा.प. कार्यालयात पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.

Protected Content