Home राजकीय एनडीएच्या बैठकीला शिवसेना गैरहजर राहणार

एनडीएच्या बैठकीला शिवसेना गैरहजर राहणार

0
128
uddhavthackeray modi

uddhavthackeray modi
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीच्या घटकपक्षांची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तास्थापनेवरू शिवसेना आणि भाजपामध्ये दरी वाढली आहे.


Protected Content

Play sound