Home Cities जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय आघाडीतर्फे जळगाव शहरात सामाजिक बांधिलकी जपत पाणपोई सुरू करण्यात आली आहे. सिंधी कॉलनी रोडवरील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर उभारण्यात आलेल्या या पाणपोईचे लोकार्पण राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिक, पादचारी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे शहरात पिण्याच्या पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवसेना वैद्यकीय आघाडीने नागरिकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. सिंधी कॉलनी रोड हा जळगाव शहरातील कायम वर्दळीचा परिसर असल्याने या पाणपोईचा दररोज शेकडो नागरिकांना फायदा होणार आहे. सामाजिक जाणिवेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

लोकार्पण सोहळ्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना वैद्यकीय आघाडीच्या या उपक्रमाचे अभिनंदन करत सामाजिक कार्यात अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वसामान्य नागरिकांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही खऱ्या अर्थाने लोकसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आगामी काळातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

या कार्यक्रमाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र गवळी तसेच शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख श्याम कोगटा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांना पिण्याचे पाणी वाटप करत सेवाभावी उपक्रमात सहभाग नोंदविला.

यावेळी संतोष पाटील, राहुल नेतलेकर, राहुल सांगिले, सचिन सोनार, राजेंद्र सपकाळे, सागर गवळी, दीपक पाटील, शुभम गवळी, चेतन परदेशी, विजय भाटी, सोनू तायडे, अमोल जगताप, विशाल निकम यांच्यासह शिवसेना वैद्यकीय आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेशी अधिक घट्ट नाते निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Protected Content

Play sound