शिवसेना नेत्याला ईडीचा दणका : ७८ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे शिवसेनेतील फुटीवरून राजकीय धुमश्‍चक्री सुरू असतांनाच शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने धडक कारवाई करत त्यांची तब्बल ७८ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली असून यातून आता राज्यात नवे राजकीय समीकरण जन्माला येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. शिंदे यांनी सोबत घेतलेल्या बहुतेक नेत्यांना भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांची व त्यातही ईडीची भिती दाखविल्याचा आरोप मविआ नेत्यांनी केला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज उध्दव ठाकरे यांच्यासोबतच शिवसेनेच असलेले नेते माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने धडक कारवाई केली आहे.

ईडीने आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत अर्जुन खोतकर यांची तब्बल ७८ कोटी रूपयांची जमीनीसह इतर मालमत्ता जप्त केल्याचे जाहीर केले आहे. यात नेमकी कोणती मालमत्ता जप्त करण्यात आलीय याचा तपशील देण्यात आलेला नाही. तथापि, यात जालना सहकारी साखर कारखान्याच्या जमीनीसह इमारती आणि इतर मालमत्तांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Protected Content