पांझरापोळ परिसरात शिवसेनेतर्फे ॲन्टीजन तपासणी शिबीराला सुरूवात

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पांझरपोळ परिसरातील जळगाव पब्लिक स्कूलच्या आवाहरात शिवसेना महानगर आणि महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी दिवसभर ॲन्टीजन तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीरात दिवसभरात एकुण ७० जणांची तपासणी करण्यात आली. त्यात दोन रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे. 

सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे लसीकरणाची देखील जोरदार तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. सोबत विविध संघटनेच्या माध्यमातून कोवीड ॲन्टीजन टेस्टसाठी सहकार्य लाभत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना महानगर आणि महापालिकेच्या वतीने जोशी पेठेतील जळगाव पब्लिक स्कूलमध्ये  आज सोमवार २६ एप्रिल रोजी ॲन्टीजन टेस्ट शिबीराला सुरूवात करण्यात आली. आज दिवसभरात एकुण ७० रूग्णांची तपासणी केली असता दोन रूग्ण कोरोना बाधित असल्याचे दिसून आले आहे. दोन्ही रूग्णांना महापालिकेच्या कोवीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

या शिबीरासाठी माजी महापौर नितीन लढ्ढा, महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेविका राखी सोनवणे, ज्योती तायडे, विभागप्रमुख प्रशांत सुरळकर, डॉ. पल्लवी विसावे, भाग्यश्री सुर्यवंशी, मेघा सुर्यवंशी, जुने जळगाव नर्सिंग स्टॉप, मुन्ना परदेशी, कुंदन चौधरी, नारायण कोळी, पिंटू बेडिस्कर, आबा चौधरी, आनंद चौधरी, गणेश पाटील, मुन्न मराठे, कल्पेश बनवे, योगेश पाटील, प्रल्हाद पाटील यांच्यासह तरूण कुढापा मंडळ आणि शिवसैनिक यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content