पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा भव्य समारोप सोहळा उद्या पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील महालपुरे मंगल कार्यालयात सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे उपनेते तथा जिल्ह्याचे निरीक्षक लक्ष्मणराव वडले, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत, मुंबईचे निरीक्षक रमेश तारे, संजय माने, पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने हे मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यास पाचोरा – भडगाव तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख, युवा उपजिल्हाधिकारी, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपशहरप्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, उप तालुका प्रमुख, शेतकरी सेना, महिला आघाडी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख, गण प्रमुख, जि. प. सदस्य, कृ. ऊ. बा. समिती सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, अल्पसंख्याक आघाडी, शिक्षक सेना, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व अंगीकृत संघटना, ज्येष्ठ शिवसैनिक, युवा सेना यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पाचोरा – भडगाव शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.