जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज रोजी सकाळी ११ वाजता प्रशासन विभागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रकाश शर्मा, प्रा. गणेश पाटील, रजिस्टार अरुण पाटील, स्टोर इन्चार्ज अजय चौधरी, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मंगेश उपासनी, चंद्रकांत ढाकणे, महेंद्र ढोणे, आसिफ पिजारी, पवन अस्वार, कमलाकर सोनावणे, योगेश गनुरकर, राहुल कापडणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले.