बचत गटांना भविष्यात जिल्ह्याबाहेर व्यासपीठ उपलब्ध करून देणारा – आ. शिरीष चौधरी

फैजपूर प्रतिनिधी । रावेर यावल मतदार संघातील महिला भगिनींच्या बचत गटांना भविष्यात जिल्हा बाहेर मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा शब्द आमदार शिरीष चौधरी यांनी दिला. महिला बचत गट निर्मित ‘सरस्वती वस्तू भांडार’ च्या दालनाचा आज शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

सातपुडा विकास मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र पाल तर्फे या बचत गटांना येथील औषधनिर्माण-शास्त्र महाविद्यालया समोर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे या वेळी आमदार शिरीष चौधरी यांनी निवडणुकीपूर्वी मतदार संघातील बचत गटांच्या महिलांना त्यांच्या मालाची विक्री  करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता मात्र कोरोनामुळे त्यास विलंब झाल्याची  कबुली देत भविष्यात जळगाव, पुणे, नाशिक, मुंबई यासह अन्य जिल्हा ठिकाणी बचत गटांचे प्रदर्शन लावून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. माजी आमदार अरुण पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे सांगितले तर आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांनी मतदार संघातील महिलांसाठी हे प्राथमिक स्वरूपात  उचललेले छोटेसे पाऊल आहे भविष्यात अशा उपक्रमासाठी काहीही सहकार्य लागत  असल्यास निसंकोच सांगावे त्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली या उपक्रमाअंतर्गत दररोज दहा ते बारा बचत गटांना दोन दिवस फिरत्या पद्धतीने आपले साहित्य विक्री करण्याची संधी उपलब्ध होणार आहे यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, बचत गट सदस्या जोशना महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक महेश महाजन व धीरज नेहते यांनी  केले 

यावेळी नगराध्यक्षा महानंदा होले, जि प सदस्या सुरेखा पाटील, तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे, सातपुडा विकास मंडळाचे सचिव अजित पाटील, उपाध्यक्ष अशोक झांबरे ,पालच्या सरपंच हजरा तडवी, आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अरुणा चौधरी, राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष जे के पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष पी आर पाटील, प्रल्हाद बोंडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे,  कलीम मन्यार, रघुनाथ कुंभार, वसीम तडवी, शेख रियाज, लीलाधर चौधरी, एस के चौधरी, धनाजी नाना महाविद्यालया चे माजी प्राचार्य डॉ एस् एस्  पाटील,  अनिल लढे,  प्राचार्य व्ही आर पाटील, यांच्यासह महिला बचत गटांच्या सदस्या यांची उपस्थिती होती

 

Protected Content