यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विरावली येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पुरस्कृत ‘शेतकरी परिवर्तन पॅनल’ला १२ पैकी १o जागा मिळाल्या तर ‘शिवसेना’ पुरस्कृत ‘शेतकरी एकता पॅनल’ला २ जागांवर समाधान मानावे लागले.
४९६ पैकी एकूण ३९० सभासदानी केले मतदान –
या विकासोच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवामध्ये सर्वाधिक मतांनी बाजीराव माणिक पाटील यांनी २०० मते मिळवून विजय मिळवला तर अन्य विजयी उमेदवारात प्रल्हाद पाटील, कोकिळा पाटील, अर्जुन पाटील, प्रमिला पाटील, उषा महाजन, युवराज पाटील, गुलाब पाटील, नरेंद्र कोळी, रमेश पाटील यांचा तर ‘शेतकरी एकता पॅनल’मधून तुषार साडू पाटील व संजय मोतीराम पाटील यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲड.देवकांत पाटील, नावरे माजी सरपंच समाधान पाटील, रमेश पाटील, माजी चेअरमन संजय पाटील, राष्ट्रवादी उपाध्यक्ष पवन महाजन पाटील, शरद राजपूत, यशवंतराव पाटील, गोरख पाटील, गणेश पाटील यांनी केले तर शेतकरी एकता पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख तुषार पाटील यांनी केले. त्यांच्या पॅनलच्या चार उमेदवारांना अत्यंत कमी मतांनी पराभव पत्कारावा लागला असल्याचे त्यांनी सांगीतले.