कळमसरे येथे संत मिराबाई पुण्यतिथी साजरी

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील, कळमसरे गावात संत मिराबाई पुण्यतिथीनिमित्त प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

अमळनेर तालुक्यातील निम येथील ह.भ.प. जयेश महाराज व उपसरपंच जितेंद्र राजपूत , योगेंद्रसिंग राजपूत,जसवंतसिंग राजपूत, महारूसिंग राजपूत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. जयेश महाराज यांनी संत मीराबाई यांच्या जीवनावर प्रवचन केले. याप्रसंगी अंबालाल राजपूत, प्रविणसिंग राजपूत,अशोक राजपूत, सुरतसिंग गिरासे, किरणसिंग राजपूत,भीकेसिंग राजपूत,नगराज चौधरी,कडू चौधरी,मीराबाई चौधरी,नरेंद्रसिंग राजपूत, विजयसिंग राजपूत सतिष राजपूत,शिवाजी राजपुत आदी राजपूत समाज बांधव उपस्थित होते. महारुसिंग राजपूत यांनी यावेळी फळ व प्रसादाचे वाटप केले.

Protected Content