यावल (प्रतिनिधी)। तालुक्यात चार दिवसापुर्वी वादळीवाऱ्यासह पाऊस झाला होता. यामुळे शेतातील केळी पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते. शिवाय शेत शिवारात लावण्यात आलेली महावितरणाची अनेक विद्युत पुरवठा करणारी खांबे कोसळुन पडली. मात्र ती अद्यापपर्यंत लावली गेली नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये महावितरणाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील साकळी, शिरसाड, नावरे, वढोदे, विरावली, बोरावल, भालशिव, पिंप्री या शेतीशिवारात लावण्यात आलेली महावितरणाची खांबे २ जून २०१९ रोजी दुपारी ३ ते चार वाजेच्या दरम्यान परिसरात आलेल्या पाऊस आणी वादळीवाऱ्या मुळे या गावातील शेतातील लावलेली महावितरणाची विद्युत पुरवठा करणारी खांब ही कोसळल्याने या सर्व गावातील शेतातील विज पुरवठा गेल्या चार दिवसापासुन खंडीत झालेल्याने शेतातील लावलेली कापसाची पिके ही पाण्याअभावी कोमजु लागली असुन, मागील चार दिवसापासुन शेतात कोसळलेली खांबे आणी मोठया प्रमाणात तुटुन पडलेली तारे ही महावितरणच्या दुर्लक्षामुळे आहे त्याच ठीकाणी शेतात पडुन आहे. या सर्व प्रकारामुळे वाढलेल्या तापमान आणी विद्युत पुरवठा चार दिवसापासुन खंडीत असल्याने मोठया प्रमाणात पेरणी करण्यात आलेली कापसाची पिके पाणी अभावी धोक्यात येण्याची भिती व चिंता शेतकरी बांधवांमध्ये व्यक्त होत असुन, महावितरणच्या वतीने मान्सुनपुर्वी तात्काळ ही शेत शिवारात पडलेली खांबे पुनश्च उभी करून विजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा शेतकरी बांधवांना पावसाळा लागल्यास अनेक संकटांना तोंड द्यावे लागतील तरी महावितरणने या विषयाला गांर्भीयाने घ्यावे अशी मागणी अनेक शेतकरी बांधव करीत आहे.