शेंदुर्णी येथे शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

 

शेंदुर्णी प्रतिनिधी | येथील प.पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सरस्वती विद्या मंदिरात पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण लोकशाहिर बाबासाहेब पूरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शोक सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते उत्तमराव थोरात हे होते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ .कल्पक साने, हभप कडोबा माळी, वामन फासे, नारायण नाना गुजर, जोगेश्वर अग्रवाल, डॉ. पंकज सूर्यवंशी, विजय गुजर, प्रविण गुजर, नगरसेविका रंजनाताई घूमाळ, शुभांगी फासे, अतुल जहागीरदार, मुख्याध्यापिका शिलाबाई पाटील, गरूड महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कौमूदी साने यांनी तंत्रज्ञानाच्या साहयाने श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले. सरस्वती विद्या मंदिरा च्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमाची आठवण करत बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.शेंदुर्णी येथे बाबासाहेब यांनी तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यान केले असल्याचे सांगितले.

शिव चरित्र इतिहास संशोधनात बाबासाहेबांचे कार्य मोठे असल्याची भावना व्यक्त करत प्राध्यापक प्रशांत देशमुख सर यांनी शेंदुर्णी एज्यूकेशन सोसायटी संस्थेमार्फत अदांजली अर्पण केली.येथील वारकरी मंडळातर्फे हभप कन्हैया महाराज यांनी प्रत्येक विदयार्थ्यापर्यंत शिवचरीत्र पोहचवावीत असा संकल्प करण्याचे श्रध्दांजली पर मनोगतात आवाहन केले. कु. शुभांगी फासे यांनी सुमधूर गीत गायनाने श्रध्दांजली अर्पण केली.

अध्यक्षीय भाषणात उत्तम थोरात यांनी प्रत्येकाच्या हृदयापर्यंत छ. शिवाजी महाराज पोहचवण्यात व शिवचरित्र घराघरात पोहचवण्यासाठी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांचे योगदान असल्याचे सांगितले व श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन उपशिक्षक प्रमोद सरोदे यांनी केले. सामुहीक मंत्रपठन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Protected Content