आजपासून आशा गट प्रवर्तक यांचा राज्यव्यापी बहिष्कार आंदोलनास प्रारंभ

चोपडा, प्रतिनिधी | आशा व गटप्रवर्तक यांचे १९ प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी योग्य ती कार्यवाही महाराष्ट्र शासनाने न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र भर आज १५ जानेवारीपासून बेमुदत कोविड कामावर बहिष्कार आंदोलन सुरू केली असल्याची माहिती जळगाव जिल्हा आशा गतप्रवर्टक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटक ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

 

या बाबत सविस्तर माहिती अशी की ,महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक व कर्मचारी संघटना अशा संघटनांच्या या कृती समितीने महाराष्ट्र शासन व आरोग्य खात्याला एकूण १९ मागण्यांचे निवेदन २२ डिसेंबर २१ रोजी सादर केले आहे. कृती समितीने सादर केलेल्या एकोणीस मागण्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने जुलै २०२० पासून जाहीर केलेले मानधन वाढ एप्रिल २१ पासून देण्यात आलेले नाही. दोन महिन्याचे मानधनही दिलेले नाही. कोविड कामात निरंतर सहभाग असून सुद्धा त्या कामाचा मोबदला दिलेला नाही. अँड्रॉइड मोबाईल देण्याचे आश्वासन दिले आहे. कोविड लसीकरण ‘हर घर दस्तक’ मोहिमेत भाग घेऊनही ऑक्टोबर २१ पासून प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही. शिवाय घरच्या मोबाईलवर काम करावे लागत आहे. यावेळी लोकांचे वेळी अवेळी फोन येतात तसेच पण मोबाईल बिले पुरेसे मिळत नाही. कागदपत्र स्टेशनरीचे वर्षाला तीनशे रुपये पुरत नाहीत. शिवाय आशांच्या गणवेशाची रक्कम त्यांचे खातेवर टाकावी तसेच आशांना करावी लागणारी ७४ कामांची लिस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात लावावी. चहार्डीची..ज्योती अंबर भील या आदिवासी आशाना पूर्ववत कामावर घ्यावे. पेसा गाव अंतर्गत आशाना प्रोत्साहन भत्ता द्या. आरोग्यवर्धिनी कामासाठी सी. एच. ओ. नेमावेत. नागरी भागात गट प्रवर्तक नेमा आदी अनेक मागण्यांसाठी हा बहिष्कार टाकला आहे दरम्यान निवेदन देताना स्थानिक प्रश्नावर चोपडा वैद्यकीय अधिकारी डॉ. लासूरकर यांच्याशी चर्चा झाली त्यावेळी कार्यालतीन संबंधित कर्मचारी ही हजर होते डॉ. लासूरकर यांनी स्थानिक मानधन व फरक आरटीजीएस प्रणालीद्वारे देण्याची जिल्हा परिषद ला परवानगी मागितली आहे सांगून इतर स्थानिक प्रश्न कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे परंतु कृती समितीच्या सादर केलेल्या इतर मागण्यांसाठी जिल्ह्यात १५ जानेवारीपासून कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कायम आहे तथापि कोविळ. व्यतिरिक्त कामे सुरू ठेऊ.असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Protected Content