शेंदुर्णीत दहीहंडीच्या दिवशी दोन समुदायांमध्ये जोरदार दगडफेक

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी | दहीहंडीच्या दिवशीच दोन समुदायांमधील तरूणांमध्ये येथे संघर्ष उफाळून आल्याने जोरदार दगडफेक करण्यात आली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला असून गावात आता तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे.

याबाबत वृत्त असे की, येथे आज दहीहंडीच्या दिवशी दोन समुदायाच्या तरूणांमध्ये वाद झाले. यात दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आली. यात एसटी बसचे नुकसान झाले. तुफान दगडफेक होऊन दोन जण किरकोळ जखमी झाले तर एका गटातील जमावाने राज्य परिवहन बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. त्यात चालकाला दुखापत झाली. सुदैवाने बस मधील प्रवासी जमावाच्या हल्ल्यात सुखरूप बचावले. याच जमावाने गोंधळपुरा व देशपांडे गल्लीतील सहा मोटारसायकल फोडल्या. जमावाच्या या कृत्यामुळे गावांतील बाजारपेठ सहा वाजताच बंद झाली. येथील फुल भांडार व फळविक्रेत्यांचेही जमावाने नुकसान दगडफेकीमुळे नुकसान झाले.

दरम्यान, जमावाने पारस चौकातील रिक्षा फोडली, कुंभार गल्लीत स्विफ्ट डिझायर चारचाकी फोडली. घटनेचे गांभीर्व लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने धाव घेत वातावरण नियंत्रणात आणले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, पाचोरा उपविभागीय पोलीस भरत काकडे व पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे घटनास्थळी दाखल झाले. यामुळे आता शहरातील वातावरण शांत झाले. सध्या शहरात तणावपूर्व शांतता पसरली असून कडेकोटी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

Protected Content