शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । विधानसभेचे माजी सभापती आचार्य गजाननराव गरूड यांच्या पुण्य स्मरणार्थ ऑनलाईन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दी शेंदुर्णी सेंक. एज्युकेशन को- ऑप. सोसायटी चे दीपस्तंभ व महाराष्ट्रराज्य विधानसभेचे माजी उपसभापती कै .आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या ३६ व्या पुण्यस्मरणार्थ संपुर्ण भारतातील स्पर्धकांना सहभागी होण्यासाठी स्वस्थ भारत – तंदूरूस्त भारत या संकल्पनेवर आधारित चालणे, धावणे व सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना दिनांक २०डिसेंबर ते२७डिसेंबर २०२० या कालावधीत केव्हाही सहभाग नोंदवता येणार आहे .
कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेऊन ऑनलाइन पद्धती ने आयोजित केलेल्या या नाविन्यपुर्ण उपक्रमात चालणे , धावणे व सायकल चालविणे या तीन स्पर्धांचा समावेश आहे. आपण वरील तीन स्पर्धापैकी एका स्पर्धेत सहभागी होवू शकतात. आपल्या परिसरात ,अंगणात,गच्चीवर शाळेचे क्रीडांगण, मोकळ्या जागेवर सुरक्षीत अंतर ठेवून हा उपक्रम करायचा आहे. यात उत्कृष्ट धावकास उत्तेजनार्थ मेडल दिले जाईल. अनुक्रमे प्रथम पुरस्कार कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड ,द्वितीय पुरस्कार कै. आण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड व तृतीय पुरस्कार कै .आबासाहेब काशिनाथराव गरुड यांचे स्मरणार्थ दिले जातील.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चे आवाहन दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को- ऑप. सोसायटी चे अध्यक्ष -संजय गरुड व सचिव- सतीश चंद्र काशीद व सहसचिव- दिपक गरुड व प्रधान कार्यालय वसतिगृह सचिव- कैलास देशमुख तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य- डॉ वासुदेव रमेश पाटील ,उपप्राचार्य आर.जी.पाटील व शारीरिक शिक्षण संचालक- प्रा.डॉ. महेश पाटील, प्रविण गरुड अध्यक्ष- आदर्श तरुण मित्र मंडळ शेंदुर्णी , अरीफभाई .अध्यक्ष- संजयदादा सांस्कृतिक व क्रीडा मंडळ शेंदूर्णी यांनी केले आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी खालील प्रमाणे आयोजक सदस्यास फोन द्वारे संपर्क करुन नोंदणी करून स्पर्धेसाठी लिंकची माहिती घ्यावी.
१).प्रा डॉ ए. एन.जिवरग मो क्र ८९५६७६४६६०
२).प्रा डॉ सौ योगिता चौधरी मो.क. ९७३०६२४३९७
३).प्रा.डॉ.महेश पाटिल मो.क्र . ८३२९४७०१४६
४)प्रा.डॉ.दिनेश पाटिल.मो. ९७६४५९८९९९