जागतिक महिला दिनीनिमित्त आश्रय फाऊंडेशनतर्फे महिला कोरोना योद्धांचा सन्मान

यावल प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त आश्रय फाऊंडेशनच्या वतीने देशात ओढवलेल्या कोरोना विषाणुसंसर्गाच्या संकटासमयी नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृतीचे लक्षणीय कार्य करणाऱ्या महिला कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढत्या प्रादुर्भावा मुळे कार्यक्रम आयोजित करण्यास असलेल्या आरोग्य आणी शासन नियमांच्या विविध अडचणींमुळे प्रातिनिधीक स्वरूपात १२ आशा स्वयंसेविकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेत. कोरोना काळात आपले आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी समर्पित करून आपला जीव धोक्यात घालून करीत असलेल्या मानवजातीची सेवा करणाऱ्या  यावल तालुक्यातील आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांचा आश्रय फॉउंडेशन यावल रावेर च्या वतीने जागतिक महिला दिनामिनीत कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. डॉ. जागृती फेगडे व डॉ. स्नेहल जावळे यांच्या हस्ते सन्मान प्रमाणपत्र देऊन आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी आश्रय फॉउंडेशन चे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, डॉ. प्रशांत जावळे या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढील २ दिवसात तालुक्यातील १००आशा स्वयंसेविका आणि आरोग्यसेविका यांचा गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहीती आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ .कुंदन फेगडे यांनी सांगीतले आहे.

 

Protected Content