शेळगाव व बोदवड योजनांसह बलून बंधार्‍यांना मान्यता

delhi meeting

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेळगाव बंधारा, बोदवड सिंचन योजना व गिरणा नदीवरील बलून बंधार्‍यांना केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिल्याने या योजनांचा निधी मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीची बैठक सोमवारी दिल्लीत झाली. या बैठकीला केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यू.पी. सिंग, जल आयोगाचे अध्यक्ष आर. के. जैन, आयोगाचे मुख्य अभियंता विजय सरन, संचालक एन. मुखर्जी, पीयूष रंजन यांच्यासह वित्त व कृषी विभागाचे सचिव, अधिकारी उपस्थित होते. तापी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे संजय कुळकर्णी, अधीक्षक अभियंता आनंद मोरे, शेळगाव व बलून बंधारे प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता पी. आर. मोरे, बोदवड योजनेचे कार्यकारी अभियंता गोकूळ महाजन, सचिन पाटील, एम. डी. सोनवणे, बी. आर. चौधरी आदी उपस्थित होते. यात या तिन्ही योजनांना मंजुरी देण्यात आली. यामुळे शेळगाव बॅरेज प्रकल्पाला ९६१.१० कोटी रुपये, सात बलून बंधार्‍यांना ७८१.३२ कोटी रुपये, बोदवड उपसा सिंचन योजनेला ३७६३.६० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली.

यासाठी माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील व माजी खासदार हरीभाऊ जावळे यांनी पाठपुरावा केला असून याला आता यश आल्याचे दिसून येत आहे.

Protected Content