Home राजकीय शेलार म्हणतात…”फोटो फिनीश आम्हीच करू !”

शेलार म्हणतात…”फोटो फिनीश आम्हीच करू !”

0
165


ashish shelar

मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडीच्या शक्तीप्रदर्शनाची खिल्ली उडवत भाजपचे नेते आशीष शेलार यांनी फोटो तुमचा…फोटोग्राफरही तुमचाच…मात्र फोटो फिनीश आम्ही करू असे सांगत प्रतिआव्हान दिले आहे.

महाविकास आघाडीने ग्रँड हयात हॉटेलमध्ये आपल्यासोबत असणार्‍या १६२ आमदारांना एकजुटतेची शपथ दिली. याप्रसंगी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर लागलीच आशीष शेलार यांनी या प्रकाराने शक्ती प्रदर्शन होत नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, यातील १४५ तरी टिकणार नाहीत. आम्हीच पाच वर्ष सरकार चालवू असे ते म्हणाले. दरम्यान, फोटो तुमचा…फोटोग्राफरही तुमचाच…मात्र फोटो फिनीश आम्ही करू असे सांगत त्यांनी आघाडीला प्रतिआव्हान दिले आहे.


Protected Content

Play sound