रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहे. रायगड येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात सरचिटणीस जयंत पाटील यांनी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
पेण येथून अतुल म्हात्रे, पनवेल येथून माजी आमदार बाळाराम पाटील, उरण येथून प्रीतम म्हात्रे, तर अलिबाग येथून शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना या सर्व जागा इंडिया आघाडीमधूनच लढणार असल्याचे देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्षाला किती जागा मिळतील याकडे देखील लक्ष असणार आहे.