मुंबई /जळगाव (वृत्तसंस्था) प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. यानुसार जळगावमधून शेख शफी अब्दुल नबी शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 22 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एमआयएमने काडीमोड घेतल्यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे लोकसभेप्रमाणे उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे.
उमेदवारांची यादी
सुरेश जाधव, शिराळा
डॉ. आनंद गुरव, करवीर
दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर
बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण
बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव
दीपक शामदिरे, कोथरुड
अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर
मिलिंद काची, कसबा पेठ
शहानवाला जब्बार शेख, भोसरी
शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर
किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव
अरुण जाधव, कर्जत-जामखेड
सुधीर शंकरराव पोतदार, औसा
चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी
अरविंद सांडेकर – चिमूर
माधव कोहळे – राळेगाव
शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव
लालसू नागोटी – अहेरी
मणियार राजासाब – लातूर शहर
नंदकिशोर कुयटे – मोर्शी
अड आमोद बावने – वरोरा
अशोक विजय गायकवाड – कोपरगाव