जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मराठी पत्रकारितेचे जनक आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सन २०२२ मध्ये जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत प्रसारीत केलेल्या परिपत्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा समावेश करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भात शासनाने नव्याने परिपत्रक काढून रविवारी २० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शासकीय पध्दतीने साजरी करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येवून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, धनश्री पाटील, हणमंत मोरे, डॉ. श्रीनिवास लोंढे, महेश गुंडाळे, संजय शेळके, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी, लिलाधर कोळी आदी उपस्थित होते.