भूमिगत होऊन उगवणारे मधूनच लेक्चर देतात : पवारांनी उडविली खिल्ली

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या मेळाव्यात केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देतांना शरद पवार यांनी त्यांची खिल्ली उडवत भूमिगत होऊन उगवणारे तीन,चार महिन्यात एखादे लेक्चर देत असल्याची टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढी पाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या मेळाव्यात शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली. यावर शरद पवार यांनी त्यांना प्रत्त्यूत्तर देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात आणि मग एखादं व्याख्यान देतात. परत व्याख्यान दिल्यावर ३-४ महिने कुठे जातात माहिती नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. तसंच उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक केलं, पण उत्तर प्रदेशात आपण कोणता विकास पाहिला?, असा सवालही पवारांनी राज यांना विचारला.

शरद पवार म्हणाले, राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नसतं हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे. २०१९ ला मोदीविरोधी बोलणारे राज ठाकरे काल उत्तर प्रदेशचं कौतुक करत होते. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये कोणता विकास दिसला, कोण जाणे… राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात आणि मग एखादं व्याख्यान देतात. परत व्याख्यान दिल्यावर ३-४ महिने कुठे जातात माहिती नाही. उत्तर प्रदेशात योगींच्या काळात शेतकर्‍यांवर गाडी घालण्यात आली. त्यात अनेक शेतकरी दगावले. योगींच्या पाच वर्षांच्या राजवटीत जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण केली केली. लखीमपूर घटना असो वा हाथरसची घटना, योगींच्या राजवटीत काय झालं, हे देशाने पाहिलंय. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात अशा घटना पाहायला मिळणार नाहीत, असंही पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले की, राज ठाकरे कधीच भूमिकेवर ठाम राहत नाही. त्यांनी आता आपला मोर्चा हिंदुत्वाच्या दिशेने वळवला आहे. अयोध्या दौर्‍याची घोषणा देखील केली आहे. त्यांच्यामध्ये गुणात्मक फरक जाणवतो आहे, त्यांच्यावर आता अधिक बोलू इच्छित नाही, असं पवार म्हणाले.

Protected Content