यूपीए अध्यक्षपदाच्या जबाबदारीस पवारांचा नकार !

मुंबई- लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृतसेवा – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यपद द्यावे. तेच या पदासाठी योग्य आहेत, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. यासंदर्भात दिल्ली येथे बैठकही झाली. परंतु यूपीए चे अध्यक्षपद घेण्यास पवार यांनी नकार दिला असून अन्य कोणी एकत्र येत असतील तर यास पाठींबा नक्कीच देणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर तेथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.
गेल्या मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आल्यामुळे या सर्व चर्चा बऱ्याच रंगल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवे. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व घेणे उचित असल्याचे आणि शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखणे शक्य होईल असे मत ठरावात मांडण्यात आले.

परंतु हे सर्व फोल ठरवत शरद पवार यांनी स्पष्टच सांगत मी यूपीएचे नेतृत्वाची जबाबदारी घेणार नाही. आणि मला त्यात अजिबात रस देखील नाही, ममता बॅनर्जींचा अत्यंत शक्तिशाली पक्ष आहे, सत्ता असून लोकांचा पाठिंबा आहे.उत्तर प्रदेशात यादव यांची पण ताकद बऱ्याच प्रमाणात आहे. काँग्रेस देशाच्या प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात आहे. आज त्यांची सत्ता नसेल पण काँग्रेसचा कार्यकर्ता देशाच्या प्रत्येक राज्य, जिल्ह्यात, तालुक्यात ग्रामीण भागात आहे. त्यामुळे स्थानिक वास्तवानुसार वेगवेगळ्या पक्षातील लोक करत असतील तर त्याच्यातून काही निर्णय येण्याची शक्यता आहे, हे सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपला रोखण्यासाठी काही पर्याय देता येत असेल तर त्यांना नेहमीच सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी आपली तयारी असल्याचे शरद पवारांनी सांगितले. आणि संजय राऊत यांनी जे मत व्यक्त केले हे त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Protected Content