काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाची चर्चा शरद पवार यांनी फेटाळली

sharad pawar new 696x447

जळगाव, प्रतिनिधी | ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे, सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीकुमार शिंदे यांना उत्तर दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एक होणार आहेत, असे वक्तव्य  शिंदे यांनी केले होते.

 

विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी बुधवारी सकाळी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्याबाबतच्या सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी विलिनीकरणावर प्रतिक्रिया देण्याचे मात्र टाळले आहे. दरम्यान, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाते विलिनीकरण करायचे का, याबाबतचा निर्णय स्वत: शरद पवार हेच घेऊ शकतात, सध्या आम्ही दोन्ही स्वतंत्र पक्ष म्हणूनच आमची भूमिका मांडत आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला :- विधानसभा निवडणुकीनंतर यांचे पक्ष रिकामे होणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण झाले तर किमान विरोध तरी करू शकतील, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

Protected Content