खडसेंकडून शरद पवारांना क्लिनचीट !

pawar khadse

मुंबई (वृत्तसंस्था) मी विरोधी पक्षनेता असल्यापासून विधानसभेत राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा केला आहे. सुरुवातीपासून या गैरव्यवहारात कुठेही शरद पवार यांचे नाव नव्हते, हे मी जबाबदारीने सांगू शकतो. त्यामुळे आता अचानक गैरव्यवहारात शरद पवारांचे नाव कसे पुढे आले, याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते खडसेंनी शंका व्यक्त केली. एकप्रकारे खडसेंकडून शरद पवारांना क्लिनचीट मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीची वेळ साधून सरकारकडून जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आल्याचा अप्रत्यक्ष आरोपही शरद पवार यांनी केला होता. माझ्या राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. या दौऱ्याला सामान्य जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अशी काहीतरी कारवाई होणार, याची शंका मला होतीच. आता ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्यामुळे ही शंका खरी ठरल्याचे पवार यांनी म्हटले होते. तशात आता एकनाथ खडसे यांनीदेखील शरद पवार यांची पाठराखण केली आहे. सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेत्याने अशी शंका उपस्थित केल्याने विरोधकांच्या दाव्याला बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विरोधक आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Protected Content