फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी आज नऊ संचालक आणि समर्थकांसह धुळे येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वीच शरद महाजन हे आपल्या सहकार्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर त्यांची मनधरणी करण्यातचे बरेच प्रयत्न झाले होते. मात्र ते आपल्या विचारावर ठाम होते. दरम्यान, आज धुळे येथे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आज मंगळवारी धुळे येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात शरद महाजन भाजपात त्यांचा प्रवेश झाला. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मसाका चेअरमन शरद महाजन, व्हा चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे, मिलिंद नेहेते, निर्मला महाजन, शालिनी महाजन, सुरेश माधवराव पाटील, संजय चुडामण पाटील, माधुरी प्रमोद झोपे, युवराज सरोदे, रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, यावल नगरसेवक गिरीश महाजन,न्हावीचे सरपंच भारती चौधरी, उपसरपंच सतीश जंगले, सांगवी सरपंच भालचंद्र भंगाळे व उपसरपंच विकास धांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मिलिंद महाजन, उमेश बेंडाळे यासह न्हावी येथील दूध उत्पादक संस्था, विकास सोसायटी, जे टी महाजन फ्रुट सोसायटी, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते यांनी आज भाजपात प्रवेश केला. यातील मिलींद नेहते आणि युवराज सरोदे हे नंतर प्रवेश करणार असले तरी त्यांनी आज प्रवेशाला दुजोरा दिला आहे.
या प्रवेशावेळी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, ना. हरिभाऊ जावळे, आ. स्मिता वाघ, आ. चंदूलाल पटेल, आ संजय सावकारे, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ संजय पाटील यांची उपस्थिती होती.
पहा : शरद महाजन व समर्थकांच्या भाजप प्रवेशाचा व्हिडीओ.