शाम दीक्षित खून प्रकरण : हॉटेलमध्ये वाद ; मध्यरात्री गेम !

1998748a 3ec4 4fb2 a947 136e560d700a

जळगाव प्रतिनिधी । शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला होता. मुन्ना व शामसोबत रात्री असणाऱ्या मित्रांनी काही महत्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानुसार बसस्थानक मागील हॉटेल रिगलमध्ये मध्यरात्री वाद झाला आणि त्यानंतर शामचा गेम करण्यात आल्याचा अंदाज आहे. एकंदरीत पोलिस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

 

शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा पहाटे खून झाल्याचे उघडकीस आले होते. शाम हा महसूल खात्यातील खासगी कामे करत होता. तसेच तो एका राजकीय पक्षाशी संबंधीत होता. दरम्यान, पोलीस तपासात शाम दीक्षितसह याने चार जणांसह शहरातील बस स्थानक लगत असलेल्या रिगल एका हॉटेलमध्ये मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्य प्राशन केले. पोलिसांनी रात्री सोबत मद्यपान करणाऱ्या दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर शाम दीक्षित सोबत मुन्ना नामक तरुण असल्याची माहिती समोर आली. मुन्ना हा गणेश वाडीत राहत असल्याचे कळते. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहिती नुसार शाम दीक्षित सोबत मुन्नाचा रात्री १० वाजेपासून वाद सुरु होता. मद्यप्राशन करत असतांना देखील दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु होती. यावेळी दोघांमध्ये त्याच्या मित्रांनी मध्यस्थी केली. साधारण १ वाजेच्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडल्यावर देखील दोघांमध्ये वाद सुरुच होता. शाम आणि मुन्ना हे दोघं जण कासमवाडी परिसरातच एकत्र राहतात. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले दोघं मित्र घरी निघून गेले. तर मुन्ना आणि शाम हे पण घरी रवाना झाले.

 

पोलिसांच्या अंदाजानुसार शाम आणि मुन्ना घरी परतत असतांना दोघांमध्ये पुन्हा साईबाबा मंदिराजवळ वाद झाला असावा. त्यांनतर दोघांमध्ये हातापाई देखील झाली असेल. या हाणामारीतच मुन्नाने कदाचित जवळ पडलेला दगड शामच्या डोक्यात घातला असावा. दरम्यान, आज सकाळ पासून मुन्ना गायब आहे. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह थोड्याच वेळापूर्वी शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे. तर पत्रकारांशी बोलतांना अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, आम्हाला आरोपीचे नाव समजले आहे. प्रथमदर्शी मद्याच्या नशेत खून झाला असल्याचा अंदाज आहे. पोलीस लवकरच आरोपींना पकडण्यात यशस्वी होतील.

Protected Content