राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथीनिमित्त आदरांजली | Live Trends News | Jalgaon City & Jalgaon District: Latest Breaking News and Updates

राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

जळगाव प्रतिनिधी । येथील जळगाव पीपल्स बँकेच्या रामदास पाटील स्मृती सेवा संस्था संचलीत श्री छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात आज राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

जळगाव पीपल्स बँकेच्या रामदास पाटील स्मृती सेवा संस्थेचे चेअरमन प्रकाश चौबे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन केले. यानंतर प्रकाश चौबे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याबाबत सविस्तर माहिती देऊन त्यांच्या आदर्शाचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी हॉस्पीटलचे व्यवस्थापक संतोष नवगाळे यांच्यासह संपूर्ण डॉक्टर व कर्मचारी वृंद उपस्थित होता.

Add Comment

Protected Content