सात गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त; साडेपाच लाखांचा मुद्देमाल नष्ट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारातील जंगलात असलेल्या अवैधरित्या सुरू असलेल्या ७ गावठी हातभट्टीवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत सुमारे साडे पाच लाख रूपये किंमतीचे दारू बनविण्याचे साहित्य व कच्चे रसायन नष्ट केले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारातील जंगलामध्ये अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने गुरूवार १७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास एमआयडीसी पोलीसांनी विशेष मोहीमेतंर्गत त्याठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या ७ दारु तयार करण्याच्या भट्ट्या उद्ववस्थ केल्या. (एलटीएन)यामध्ये ५ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे ११ हजार ४६० लिटर गावठी दारु आणि कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अधिकार पाटील, पोना प्रदीप पाटील, योगेश बारी, नितीन ठाकूर, शुध्दोधन ढवळे, गणेश ठाकरे, तुषार गिरासे, नाना तायडे, किरण पाटील, मंदार पाटील, सिध्देश्वर डापकर, रतन गिते, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने केली.

Protected Content