नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शहर परिसरात वेगवगेळ्या चार घटनांत सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोदावरी नदीत तिघेजण बुडाले, वालदेवी धरण परिसरात एकजण बुडाला, याच परिसरातील चेहेडी संगमावर दोघे मित्र बुडाले. शहरातील अंबड भागात गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या चिमुरड्याचा ट्रॅक्टरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. मात्र गणेश विसर्जनादरम्यान शहर परिसरात तब्बल ७ जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी ८.३० वाजेच्या सुमारास गोदा घाटावर ३ गणेश भक्त बुडाले. त्यांचा शोध सकाळी लागला असून गोदावरी नदी तीन युवकांचे मृतदेह आढळले. तर दुसरीकडे वडनेर दुमाला येथील वालदेवी नदीपात्रामध्ये एकजण गणपती विसर्जन दरम्यान पाण्यात बुडाला होता. त्यानंतर त्याला वाचण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला. चेहडी येथील संगमेश्वर नदीपात्रात सिन्नर फाटा परिसरात राहणाऱ्या दोघांचा गणेश विसर्जन करत असताना बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याचा शोध घेऊन नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर रात्री १० वाजेच्या सुमारास अंबड परिसरात ट्रॅक्टरखाली सापडून ६ वर्षीय मुलाचा नाहक बळी गेला. असा एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.