जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभुमीवर आचार संहितेच्या काळात जळगांव जिल्ह्यात विविध प्रकरणांमध्ये 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी 03 तर मद्य प्राशन करुन धुमाकूळ घातल्या प्रकरणी 01 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनाधिकृतपणे बंदी असलेला गुटखा व मद्याची वाहतूक केल्या प्रकरणी 07 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याकालवधीत 08 लक्ष 65 हजार 100 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर 05 लक्ष 19 हजार 787 रुपयाचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कालावधीत आचार संहिता भंग तसेच निवडणूकीवर परिणाम करू शकतील असे अवैध प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी जिल्हाभरात मोठी कामगिरी केली आहे. त्यात जामनेर येथे विनापरवानगी प्रचार सभा घेतल्या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. यासोबतच अवैधपणे गांज्याची वाहतूक, प्रतिबंध असलेल्या गुटख्याची वाहतूक तसेच अवैधरित्या मद्याचे वाहतूक, निवडणूकी विषयी विनाकारण अफवा पसरविणे, मद्य प्राशन करुन निवडणूक कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणे तसेच ईव्हीएम मशिन्सचे प्रात्यक्षिक सुरु असतांना विनापरवानगी छायाचित्र काढणे याबाबतीत जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, भडगांव, पाचोरा, पहूर, जळगांव तालुका, पारोळा, मलकापुर या पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या नाका तपासणी पथकाला एम.एच.19 सी.झेङ 8569 या कारमध्ये 08 लक्ष 65 हजार 100 रुपये आढळुन आले आहे. या प्रकरणी तक्रार जिल्हास्तरावर पाठविण्यात आली आहे.
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल
6 months ago
No Comments