यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील प्रथमवर्ग न्यायालयात शनिवारी रोजी दि. १३ ऑगस्ट राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. १९ प्रकरणांमध्ये निपटारा होत ३८ लाख ९४ हजार ८६५ रुपयांची महसुलची वसुली झाली.
या लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व दाखल होण्यापूर्वीचे विविध वित्तीय संस्थाचे एकूण ९११ प्रकरण ठेवण्यात आले होते; तर यातील १९ प्रकरणांमध्ये तडजोड करीत निपटारा करण्यात आला. यातून ३८ लाख ९४ हजार ८६५ रुपयांची महसुलची वसुली झाली.
यावल येथील प्रथमवर्ग न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. यात पॅनल प्रमुख म्हणून सह दिवाणी न्यायाधीश व्ही. एस. डामरे तर पंच न्यायाधीश म्हणून एड. के.डी. सोनवणे, एड. डी.आर. बाविस्कर यांनी कामकाज पाहिले. या पॅनल समोर दिवाणी व फौजदारी १७९ व दाखल होण्यापूर्वीचे ७३२ असे एकूण ९११ प्रकरण ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी खटल्यात ५ प्रकरणात तडजोड करून निपटारा करण्यात आला तर ०९ लाख ३५ हजार ८६५ रुपयांचा महसुल वसूल करण्यात आला.
फौजदारी प्रकरणात ५ केसेस तडजोडीने निकाली काढण्यात आल्या. यात ०८ लाख ६८ हजार रुपयांची वसूली करण्यात आली. दाखल होण्यापूर्वीचे ९ प्रकरण निकाली काढण्यात आले ज्यात २० लाख ९१ हजार रुपयांचा वसूल न्यायालयासमोर करण्यात आला.
या राष्ट्रीय लोक अदालतिच्या पॅनल समोर ठेवण्यात आलेल्या एकूण ९११ पैकी १९ प्रकरणात आपसात तडजोड करुन निपटारा करण्यात येऊन ३८ लाख ९४ हजार ८६५ रुपयाची महसूलाची वसुली करण्यात आली. सन २००६ मध्ये दाखल केलेला तीन भावांमधील वाटणी संदर्भातील व २oo९ साली दाखल केलेल्या एका दरखास्त प्रकरणात न्यायालयाने वादीच्या बाजूने डिक्री दिली होती. त्यामध्ये प्रतिवादीने स्वतःहून पावसाचे पाणी वाहून जाण्याकरता असलेले टीन पत्रे काढून घेतले. ८५ वर्षाची वृद्ध वादी स्त्रीचे सादर दावे आज रोजी सामंजस्याने निकाली काढण्यात आले.
या राष्ट्रीय लोक अदालतसाठी वकील संघ यावलचे तालुकाध्यक्ष निलेश मोरे, सचिव दत्तात्रेय सावकारे, वरिष्ठ वकील एस.जी.कवडीवाले, एन.एम.चौधरी, खालिद शेख, एन.पी.पाटील, ए.एम.कुलकर्णी, यु.सी.बडगुजर, धीरज चौधरी, गौरव पाटील, याकूब तडवी, राजेश बारी हे होते. तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायालयीन सहाय्यक अधीक्षक सी.एम.झोपे, व्हीं.आर.तायडे, आर.एस.बडगुजर, एस.आर.तडवी, एस.जी सूर्यवंशी, डी.ए.गावंडे, एस.जे.ठाकूर, एस.एस.वाघ, पी.डी.चव्हाण, अंकुश सावदेकर, गजानन.लाड, आर.एस.रायपूरे, डी.ए..घनमोडे यांनी कमकाज पाहिले. पी.एल.व्ही.अग्रवाल, वारुळकर, बढे लोकअदालतला उपस्थित होते.