पाचोरा येथे गो.से.हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा व वृक्षारोपण उत्साहात संपन्न

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल येथे विविध स्पर्धा, वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाची शपथ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी वनविभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी सरिता पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी डी.डी.कुमावत यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची गरज समजावून सांगितली व पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. याप्रसंगी चित्रकला स्पर्धा वकृत्व स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक वनीकरण विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी सरिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास वनपाल डी.एम.कोळी, शहरातील पत्रकार प्रा.सी.एन.चौधरी, अनिल येवले, किशोर रायसाकडा, प्रमोद पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्रमिला वाघ व पर्यवेक्षक यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सरिता पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शहीद भगतसिंग यांच्या बलिदानाची व शौर्याची गाथा सांगितली. सी.एन.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पाचोरा शहराचा इतिहास व स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान स्पष्ट करून सांगितले. शाळेच्या सर्व कला शिक्षकांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. वनपरिक्षेत्र अधिकारी सरिता पाटील, पत्रकार बांधव तसेच मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी पर्यवेक्षक आर.एल.पाटील, एन.आर.ठाकरे, ए.बी.अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.तडवी विद्यालयातील स्काऊट गाईडचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डी.डी.कुमावत यांनी तर आभार प्रदर्शन सुबोध कांतायन यांनी केले.

Protected Content