भगवान पुरी यांचा सेवापूर्ती सोहळा

bhagwan puriयावल प्रतिनिधी । येथील पंचायत समिती यावल मध्ये आरोग्य सेवक म्हणुन कार्यरत असलेले भगवान गणपत पुरी यांना नुकताच सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला.

मूळचे ऐनपूर (ता. रावेर) येथील रहिवासी असणारे भगवान गणपत पुरी हे ३८ वर्षांच्या सेवेनंतर नुकतेच निवृत्त झाले. त्यांनी १९८४मध्ये सर्वप्रथम जामनेर येथे दोन वर्ष आरोग्य सेवक म्हणुन सेवा बजावली, त्यानंतर त्यांनी आरोग्य सेवक या पदावर पिंपरखेड तालुका भडगाव दोन वर्ष, पिंपळगाव हरेश्‍वर येथे प्राथमिक आरोग्य केन्द्रात दोन वर्ष सेवा केल्यानंतर ते १९९४ला बढती वर आरोग्य सहाय्यक म्हणुन धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात तिन वर्ष कार्यरत होते. यानंतर वाघोड तालुका रावेर येथे तीन वर्ष, त्यानंतर सावखेडा सिम तालुका यावल या आरोग्य केन्द्रावर त्यांनी १२ वर्ष सेवा केली, चाळीसगाव तालुक्यातील लोंढा प्राथमिक आरोग्य केन्द्रावर दोन वर्ष आणी नंतर २०१५पासुन यावल येथे सेवा करून सेवा निवृत झाले,. यावल पंचायत समितीच्या कार्यक्रमात माजी आमदार शिरीषदादा चौधरी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे, तसेच त्यांचे सह कर्मचारी व इतर मान्यवराच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला.

Protected Content