जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘केळी पीक लागवड व संगोपन’ या विषयावर आज डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव खु. येथे चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रात केळी लागवड विषयी मंथन होऊन अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या.
या चर्चासत्रात केळी पिक लागवड कशी करावी ? खताचे नियोजन कसे करावे..? जमिनीच्या उपलब्धतेप्रमाणे लागवडीचे नियोजन कसे करावे.? या विषयावर हर्मोनिक बायोटेकचे श्री.संदीप राऊत यांनी सखोल मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रात गोदावरी समूहाचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील, कृषी परिसर संचालक डॉ. एस एम पाटील, शिक्षण व संशोधक संचालक डॉ.अशोक चौधरी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी आर सपकाळे, उद्यान विद्या विभाग संचालक प्रा.सतीश सावके, सहाय्यक कुलसचिव अतुल बोंडे, प्रा. मोनिका भावसार, प्रा. यशोदीप पवार, कृषी अभियांत्रिकी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी तर परिसरातील सुरेश पाटील, राजेंद्र महाजन, गोपाळ पाटील, भगवान महाजन,सरपंच विलास पाटील, देविदास पाटील, नरेश पाटील हे प्रगतशील शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती.