केळी बाजारभावात फसवणुकीकडे लक्ष वेधण्यासाठी रावेरात लाक्षणिक उपोषण (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 06 19 at 1.41.57 PM

रावेर (प्रतिनिधी ) येथील तालुक्यातील केळी बाजार भावाचा प्रश्न ऐरणीवर असून त्यासाठी यापूर्वी १४ रोजी शेतकऱ्यांशी चर्च आयोजन केले होते. त्यानंतर बाजार समितीने ठरल्याप्रमाणे अधिकृत व्यापाऱ्यांची यादी जाहीर केली. सोमवारी व्यापाऱ्यांसोबत बैठक ही आयोजित केली. मात्र त्या बैठकीस १२ ते १५ व्यापारीच उपस्थित राहिले. त्यात समाधानकारक तोडगा निघाला नाही.  त्याअनुषंगाने आज रावेर तहसील समोर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी लाक्षणिक उपोषण केले.

 

यावेळी निंभोऱ्याचे सुनील कोंडे, माजी जिप सदस्य रमेश पाटील, निंभोरा उपसरपंच सुभाष महाराज,रवींद्र बारी, धनराज खाचणे,मदन खाचणे, डिगंबर नेहेते, अप्पा भंगाळे,किरण कोंडे, डी डी वाणी (फोटोग्राफर ),दसनुरचे मिलिंद पाटील, श्रीकांत महाजन,योगेंद्र पाटील,अनिल चौधरी, संजय चौधरी रसलपूर, सुरेश शिंदे, उटखेड्याचे बळीराम महाजन, चंद्रकांत सांगळे, अविनाश सांगळे, सुरज पाटील, राहुल शिंदे, तुकाराम पाटील, ईश्वर निळे, पातोंडीचे चेतन सांगळे, बाळकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, देवेंद्र पाटील, न्हावीचे संतोष बेंडाळे, एकनाथ महाजन ,युवराज महाजन, प्रमोद चौधरी,खानापूरचे गोवर्धन बोंडे, जयंत पायील, खिर्डी,डॉ. मनोहर पाटील, वसंत पाटील ,कृष्णा पाटील, विजय परदेशी,जगदीश पाटील,दोध्याचे राहुल महाजन,विजय पाटील, सतीश महाजन, कोचुर,संतोष महाजन ,विवरा,खिरवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका कल्पना उत्तमराव पाटील,,उत्तमराव पाटील,जय शिंदे,शे.तस्लिम , समाधान कोळी, रघुनाथ शिंदे, शैलेश सांगळे,कोचुरचे ऋषिकेश पंडित, रितेश मस्कावदे , निंभोरा सिमचे जिजाबराव पाटील, विवऱ्याचे किशोर पाटील यांसह तालुकभरातून केळी उत्पादक हजर होते. यावेळी रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना केळी उत्पादकांतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी सरबत देऊन शेतकऱ्यांचे उपोषण सोडविले. मात्र शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याच्या भीतीने कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यापैकी कोणीही उपोषणस्थळी फिरकले नसल्याचे चर्चा रंगली होती.

Protected Content