प्लॉटची खरेदी करून न देता, तोच प्लॉट परस्पर दुसऱ्याला विक्री

जळगाव –  लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्लॉटची खरेदी करून न देता संबंधित प्लॉट परस्पर दुसऱ्याला विक्री करून पिंप्राळा येथील तरूणाची ४ लाख ९८ हजार ३३० रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शकील अमीर शेख (वय-३४) रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हे दुध विक्री करून उदरनिर्वाह करतात. जानेवारी २०११ मध्ये डॉ. उल्हास बेंडाळे आणि विनायक बेंडाळे यांनी त्यांच्या मालकीच्या पिंप्राळा शिवारातील गट नंबर २१४/४ येथे शेतात प्लॉट पाडून विक्री होत असल्याची माहिती माजी नगरसेवक शरीफ सरदार पिंजारी यांच्या माध्यमातून शकील शेख यांना मिळाली होती. त्यानुसार  प्लॉटची रक्कम दोन वर्षात अदा करण्याचे होते. त्यानुसार शकील शेख यांनी पहिला प्लॉट स्वत:च्या नावे तर दुसरा प्लॉट हा  भाऊ सलीम अमीर शेख यांच्या नावे बुक केले होते. व सुरूवातील प्रत्येकी ११ हजार रूपये आगाऊ रक्कम दिली.

शकील अमीर शेख यांनी ११ हप्त्यात एकुण ८ लाख ७६ हजार रूपये दिले. त्यान ठरल्या भावापेक्षा २ लाख ५७ हजार रूपये दिल्याने डॉ. उल्हास बेंडाळे आणि विनायक बेंडाळे यांनी शकील शेख यांना त्यांचा प्लॉट त्यांच्या नावावर करून दिली. परंतू शकील शेख यांचा भाऊ अकील शेख यांनी एकुण ४ लाख ९८ हजार ३३० रोख स्वरूपात दिले. त्यानुसार भाऊ सलीम शेख यांना प्लॉट नावावर खरेदी करून द्यावा म्हणून डॉ. उल्हास बेंडाळे आणि विनायक बेंडाळे यांच्याकडे तगादा लावला. परंतू प्रत्येकवेळी दोघेजण काहीही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत होते. डॉ. उल्हास बेंडाळे आणि विनायक बेंडाळे यांनी हा प्लॉट परस्पर विक्री केल्याची माहिती सातबारा व फेरफार बदल झाल्याचे सन २०१९ मध्ये दिसून आले. याबाबत विचारणा केली असता त्यांनी चुकून प्लॉट दुसऱ्याला विक्री केल्याचे सांगून तूम्हाला दुसरा प्लॉट खरेदी करून देतो असे सांगितले. परंतू आज तीन वर्ष होवूनही प्लॉट खेरदी करून दिलेला नाही. उलट दिलेले पैसे व पावत्या आमच्या नाहीत असे सांगून हाकलून लावले. याप्रकरणी शकील शेख यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून डॉ. उल्हास बेंडाळे आणि विनायक बेंडाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Protected Content