दादावाडी हल्ला प्रकरण : दोघं संशयितांना शिरपूर येथून घेतले ताब्यात

crime 4 3

 

जळगाव (प्रतिनिधी) बुधवारी दादावाडी परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यातील दोघा आरोपींना आज पहाटे शिरपूर येथून ताब्यात घेतले आहे. दोघं संशयितांची वैद्यकीय तपासणी करून आज दुपारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील (वय 21 रा. हिरा शिवा कॉलनी) आणि विशाल अनिल पाटील (वय 23 रा. साई नगर, जळगाव) असे दोघे आरोपींची नावे असून मोबाईल लोकेशन नुसार तालुका पोलिसांनी आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास शिरपूर येथील एका हॉस्पिटल येथून दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक फौजदार गणेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव मराठे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, प्रीतम पाटील, सतीश हरणारे यांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.

Protected Content