कर्ज वसुलीसाठी मल्ल्याची संपत्ती विकणार; पीएमएलए कोर्टाची परवानगी

vijay mallya

मुंबई वृत्तसंस्था । भारतीय बँकांचे ९ हजार कोटीं घेऊन फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. विजय मल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी मुंबईच्या पीएमएलए कोर्टाने परवानगी दिली आहे. पीएमएलए कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि इतर बँकांना विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यास परवानगी दिली आहे. तसेच, ही जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करुन कर्ज वसूल करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.

तारीख केवळ रिकव्हरी ट्रिब्यूनलच ठरवू शकतो यावर माल्ल्याच्या वकीलांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, पीएमएलए न्यायालयानं या निर्णयावर १८ तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे. तसंच मल्ल्याला आता मुंबई उच्च न्यायालयातही दाद मागता येणार आहे. बँकांना ९ हजार कोटी रूपयांचा चुना लावणाऱ्या मल्ल्यावर ब्रिटनमधील न्यायालयातही खटला सुरू आहे. मल्ल्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यातील निर्णय लंडन न्यायालयानं सुरक्षित ठेवला आहे. जानेवारी महिन्यात यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. तर विजय मल्ल्याची दिवाळखोरी घोषित करण्याची याचिकाही फेटाळजी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोट्यवधींचा चुना लावून डिसेंबर २०१६ मध्ये माल्ल्यानं लंडनमध्ये पळ ठोकला होता. सरकार आणि तपास यंत्रणा मल्ल्याला आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Protected Content