जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ. आण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात स्वलीखित काव्य वाचन व पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी भारतीय स्वातंत्र्याचा विविध राष्ट्रीय व सामाजिक प्रश्नांवर कविता सदर केल्या सोबतच पोवाडा गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी छत्रपाती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू, स्त्री सक्षमीकरण इत्यादी विषयांवर दमदार पोवाडे सदर केले. या दोन्ही स्पर्धांचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उपस्थितांना केवळ यमक जुळले म्हणजे कविता होत नाही तर कविता समाजास एक करण्याचे व प्रबोधनाचे सशक्त माध्यम आहे असे सांगितले.
स्वलीखित काव्य वाचन स्पर्धेत मुळजी जेठा महाविद्यालयाचे विद्यार्थी चंदन भामरे व मीनाक्षी ठाकूर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय पारितोषिक पटकावले तर प. क. कोटेचा महीला महाविद्यालय भुसावळची विद्यार्थिनी छाया नेवेस्कर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. पोवाडा गायन स्पर्धेत मुळजी जेठा महाविद्यायाच्या अथर्व मुंडले व समूह यांनी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक डॉ. आण्णासाहेब जी.डी. बेंडाले महीला महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिप्ती पाटील व तृतीय क्रमांक नूतन मराठा महाविद्यालयाचा विद्यार्थी नंदराज काळे यांने पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 3075,2075, व 1575 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
स्वलिखित काव्य वाचन स्पर्धेचे परीक्षण प्रा. मोरेश्वर सोनार व प्रा. गोपीचंद धनगर यांनी तर पोवाडा गायन स्पर्धेचे परीक्षण विनोद ढगे व प्रा. सुचित्रा लोंढे यांनी केले. उद्घाटन सत्रचे व बक्षीस वितरण सत्राचे अध्यक्षपद प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एन. तायडे यांनी भूषविल. उद्घाटन सत्राचे सूत्र संचलन व आभार डॉ. सत्यजित साळवे यांनी तर पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचलन व आभार डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. मराठी व संगीत विभागाच्या नेतृत्वात पार पडलेल्या या स्पर्धांच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या मार्गदर्शनात प्रा. दीपक पवार, डॉ. रुपाली चौधरी, प्रा. ऐश्वर्या परदेशी, प्रा. प्रियांका आठे,यांनी कार्य केले.