स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील ७७ हजार केळी उत्पादकांना शासन निर्णयानुसार फळपीक विम्यानी नुकसान भारपाईची रक्कम न मिळाल्याच्या निषेधार्थ स्वाभिमाने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

 

जळगाव जिल्हा हा केळीसाठी सुप्रसिद्ध जिल्हा असून जळगाव जिल्ह्यातील ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असून १८ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार पीक विम्याचा कालावधी  संपुष्टात आल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम कमी व उच्च तापमानाची तसेच चक्रीवादळ, गारपीट ,अतिवेगाचे वारे यांची नुकसान भरपाई हेक्टरी १ लाख ४० पंचनामेनुसार विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ४५ दिवसांच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. विम्याचा कालावधी संपुष्टात येऊन 45 दिवस झालेले असून सुद्धा आज तागायत शेतकऱ्यांना कोणती नुकसान भरपाई मिळालेली नाही शासन निर्णयाच्या अनुषंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारंवार करण्यात येत असून जिल्हा प्रशासनासह विमा कंपनीकडून आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जात आहे.

 

जिल्हा प्रशासनाकडून तसेच राजकीय वरदहस्थामुळे विमा कंपन्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पिक विम्याच्या रकमेपासून हेतू पुरस्कार वंचित ठेवत असल्याच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

Protected Content