जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील केसीइच्या आयएमआर महाविद्यालयात शनिवार २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता स्वावलंबी भारत या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
स्वावलंबी भारत या विषयावरील कार्यशाळेप्रसंगी डिस्ट्रिक्ट ऑफिसर नाबार्डचे श्रीकांत झांबरे, दिनेश गवाडे, समीर साने, स्टार्ट अप इंडियाचे लेखक युवराज परदेशी प्राचार्य डॉ. शिल्पा बेंडाळे, ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट हेड पुनीत शर्मा आणि अजिंक्य तोतला उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे म्हणाल्यात, ” व्यवसाय सुरु करा सांगणे सोपे असते, पण त्यासाठी काय फाॅर्मॉलीटी कराव्या लागतात.. डाॅक्युमेंटेशन काय हवे हे मार्गदर्शन फार महत्वाचे असते.तेच या कार्यशाळेत तुम्हाला सांगितले जाईल. स्वतः स्वतःची एम्प्लॉयमेंट जनरेट करा. उदाहरण म्हणुन नायका ब्रॅन्डकडे बघा. अश्या आयडिया महत्त्वाच्या ठरतात.असे सांगितले.विदयार्थांच्या अनेक शंकांची उत्तरे दिलीत. आभार डॉ. शमा सराफ यांनी मानले.