कमी किंमतीच्या मोबाईल्सचा मोह भोवला अन् तरूण फसला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कमी किंमतीत मोबाईल आणून देतो असे सांगून तरूणाला तब्बल ११ लाख ७५ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रथमेश विनायक राणे (वय-१८) रा. गणेश कॉलनी, ख्वॉजामिया दर्गाजवळ जळगाव हा तरूण राहतो. सध्या तो शिक्षण घेत आहे. दरम्यान त्याची ओळख पुण्यातील बानेर येथील दिपक प्रभु याच्याशी झाली. तुला कमी किंमतीत मोबाईल आणून देतो असे सांगून ११ लाख ७५ हजार रूपये घेतले. दिपकने मोबाईल दिले नाही म्हणून त्याच्याकडे पैसे मागितले असता त्याने प्रथमेशला धमकी देत तुझ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रथमेश राणे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.

Protected Content