कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील बांधकाम कामगार, घरेलू कामगार, मनरेगा मजूर यांच्या समस्यांकडे स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे या पार्श्वभूमीवर आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सिटू प्रणित सर्व कामगार संघटनातर्फे विविध  मागण्यांसाठीजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातील नोंदणी, नूतनीकरण, लाभ वाटप प्रक्रियेतील अनियमितता सावळागोंधळ व दलालांचा हस्तक्षेप त्वरित थांबवा अशी मागणी  केली.  यासह बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना अजून पर्यंत covid-19  काम बंद काळातील अर्थसाह्य, अवजारे खरेदी अनुदान त्वरित प्रदान करा, २  जानेवारी २०२०  रोजी नाशिक येथे विभागीय कार्यालयात कामगार उपायुक्त, विभागीय कामगार अधिकारी, कामगार प्रतिनिधी व कामगारांचे नेते यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करा. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांवर दडपशाही करणाऱ्या व्यवस्थापनावर त्वरित कारवाई करा. याप्रसंगी कॉम्रेड विजय पवार, प्रवीण चौधरी, हनीफ मुशीर, ताराबाई महाजन, जाकीर मिस्त्री आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/4039324582788775

Protected Content