भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका मुलीचे तरूणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहेत. तरूणाची माझे लग्न करून द्या असे सांगून तरूणाची आई व वहिनीला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत घरसमोर आत्मदहन करण्याचा इशारा तरूणीने दिला आहे. हा प्रकार भडगाव तालुक्यातील एका गावातील आहे.
भडगाव तालुक्यातील एका गावातील तरूणी हिचे एका तरूणाशी प्रेमसंबंध आहेत. आपले लग्न तरूणाशी लावून द्या अशी मागणी करत तरूणाच्या घरात घसुन तरूणाच्या आईला आणि त्याच्या वहिनीला शिवीगाळ व माहराण केली. एवढेच नाही तर जोपर्यंत तुमचा मुलगा घरी परत येणार नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही, नाहीतर मी तुमच्या घरासमोर आत्महत्या करून घेईन असा इशारा तरूणीने मुलाच्या नातेवाईकांना दिला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तरूणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भडगाव पोलीस कर्मचारी करीत आहे.




