यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दिवंगत खासदार व आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकर्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील कृषि उत्पन्न बाजार समिती,यावल व तहसील कार्यालय यावल यांच्या वतीने संयुक्त शेतकरी बांधवांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपक्रमाद्वारे पी एम किसान सन्मान योजनेच्या लाभांपासून वंचित राहिलेल्या शेतकर्यांसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने शिबीरचे आयोजन करण्यात आलेले आहे. माजी खासदार व आमदार कृषिमित्र स्वर्गवासी हरीभाऊ माधव जावळे यांच्या जयंती निमित्ताने दिनांक ४ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० पर्यंत सदर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शिबिरामध्ये पीएम किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत येणार्या् समस्यांचे निवारण महसूल अधिकार्यांचे उपस्थितीत एकाच छताखाली करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या शेतकरी बांधवांचे सदर योजनेचे लाभ हप्ते थांबलेले असतील त्यांनी आधार कार्ड झेरॉक्स, ७/१२ उतार्याची मूळ प्रत व पूर्वी ज्या बँक खात्यात पैसे जमा झालेले असतील त्याचे पासबुकाची झेरॉक्स इतर कागदपत्रांसह कृषि उत्पन्न बाजार समिती यावल च्या मुख्य बाजार यावल येथे संपर्क साधावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे हर्षल गोविंदा पाटील,उपसभापती बबलु जर्नादन कोळी व सर्व संचालक मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.