बीआरएस पक्षात ‘इनकमींग’ : जळगाव ग्रामीणमध्ये अनेकांचा प्रवेश !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारत राष्ट्र समिती पक्षात स्थानिक पदाधिकार्‍यांनी प्रवेश घेतला असून लवकरच मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील धरणगाव शहर आणि ग्रामीण मधील तसेच जळगाव तालुक्यातील भोकर येथील शेतकरी,  युवक आणि जेष्ठ राजकीय व्यक्तींनी भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षात जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा टेलर यांचे प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.

बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे आशीर्वादाने अबकी बार किसान सरकार हे ब्रीद वाक्य महाराष्ट्रासह देशात प्रसारित होत आहे. राज्याचे प्रभारी वामशिधरराव , प्रमुख माणिकराव कदमतसेच उत्तर महाराष्ट्र समन्वयक नानासाहेब बच्छाव यांचे नेतृत्वात जळगाव ग्रामीण सह संपूर्ण जिल्ह्यात बीआरएस पक्षाचे संघटना बांधणीसाठी आता सातत्याने दौरे करत आहेत.

यात विविध गावांतून शेतकरी युवक आणि राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती स्वयंस्फूर्तीने पक्षात प्रवेश करत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, शेतकरी बांधवांच्या तसेच युवकांच्या,माता भगिनींच्या आणि सर्व समाज बांधवांच्या कल्याणासाठी आता जळगाव जिल्ह्यात बीआरएस पक्षाचे विचार आणि शेतकरी बांधवांसाठी असणारी केसीआर यांची  कळकळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असून, नक्कीच तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात राबवून, लवकरच आगामी काळात बीआरएस पक्षाचा गुलाबी झेंडा सर्वत्र फडकेल असा ठाम विश्वास व्यक्त करत जिल्हाध्यक्ष लकी टेलर यांनी जिल्ह्यातील शेतकरी , युवकांनी आता विकासाच्या दृष्टीने बीआरएस पक्षा सोबत यावे असे आवाहन केले आहे.

याप्रसंगी धरणगाव येथील,ओंकार माळी यानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा प्रवक्ते पदाचा राजीनामा देत प्रवेश केला. यासोबत शेख कालू शेख हुसैन मोमीन ,चेतन संजय माळी,अमोल रविंद्र बडगुजर,ललित विलास बडगुजर, गणेश निंबा चौधरी,अनिकेत विलास बडगुजर,गुणवंत तुलसीदास माळी,आकाश राजेंद्र बडगुजर,जयेश प्रकाश बडगुजर,गारखेडे येथील वि.का.सोसायटी गारखेडा माजी चेअरमन जगन्नाथ महाजन,संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्थेचे बाळकृष्ण काशीराम पाटील,बशीर बना पटेल,आनंदा घनश्याम गोंधळे, योगेश जगन्नाथ महाजन,किरण लक्ष्मण पाटील,साहेबराव भागवत पाटील, भावसिंग सोनवणे (बाभळे); जळगाव तालुक्यातील भोकर येथील माजी उपसरपंच एकनाथ विक्रम पाटील,अनिल मधुरस सोनवणे,अरुण आनंदा मोरे,अरुण शंकर भील,बळीराम प्रेमराज भील, देविदास ताथू सोनवणे,पांडुरंग सुकदेव भोई,मंगल रतन सपकाळे, संदीप भगवान बाविस्कर यांचे बीआरएस पक्षात प्रवेश केला.

बीआरएसमध्ये प्रवेश केलेल्या मान्यवरांचे गुलाबी रुमाल आणि माहिती पुस्तिका देवून,

जिल्हाध्यक्ष लकी टेलर यांनी स्वागत केले. यावेळी,भगवान धनगर,नरेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.अबकी बार किसान सरकार या घोषणेने सर्वत्र परिसर यावेळी दुमदुमून गेला.

Protected Content