पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारत जर बघायचं असेल तर ग्रामीण भागातूनच भारताची निर्मिती होताना दिसते भारत आणि इंडिया दोन बाजू तयार होऊन प्रामुख्याने ग्रामीण व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणारे व त्या व्यवसायातून पोटाची खळगी भरून व जगाची तीन वेळा ताटाची सोय कशी होईल यासाठी प्रयत्न करणारा शेती शेतकरी,, प्रामुख्याने ग्रामीण गाव पाडात असतो,, शेती व शेतकऱ्यांची अवहेलना दूर करण्यासाठी स्व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव पारोळा यांच्यावतीने जोगलखेडे येथे शेतकरी संघटना फलक अनावरण करण्यात आले
. यावेळी फलक अनावरण करताना तालुकाध्यक्ष भिकनराव पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतकरी सुखी तर जग सुखी अशा भावना व्यक्त करत संघटना शेतकऱ्यांसोबत आहे प्रतिपादन केले, तर भोंडन येथील नवनियुक्त सरपंच अधिकार पाटील यांनी आधी संघटनेचे कार्यकर्ते बना व पुढे शेतकऱ्यांची सेवा सुरू ठेवून सतत शेतकऱ्यांसोबतचा प्रदीर्घ लढा असाच सुरू ठेवू, देशातली व जगातली शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना ही एकमेव जुनी संघटना असून संघटन मजबूत करून आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.
जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी माझे गाव व माझा मानस शाखा उभारणीसाठी येथूनच मुहूर्तमेढ करून संपूर्ण जिल्ह्यात शाखा अनावरण केल्या जातील माझ्या शेतकरी बापाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उपोषण निवेदन रस्ता रोको अशा लोकशाही माध्यमांतून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न कसे सोडवले जातील यावर चर्चा केली सततचा अवकाळी ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ. शासन प्रशासनाचा नियमानुसार निधी शेतकऱ्यांपर्यंत कसा आणता येईल व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे अशी ग्वाही देत मनोगत व्यक्त केले
. यावेळी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील तालुका अध्यक्ष भिकनराव पाटील तालुका उपाध्यक्ष अनिल पाटील कार्याध्यक्ष गुलाब पाटील भागवत महाजन सुनील पाटील भोंडण् सरपंच अधिकार पाटील गुलाब वाघ भानुसिंग पाटील भरत पाटील भूषण पाटील संजय पाटील मुरलीधर पाटील नामदेव पाटील रवींद्र पाटील युवराज पाटील रामराव पाटील धर्मा पाटील बाळू पाटील विठ्ठल पाटील गणेश पाटील पाटील धना पाटील बबलू पाटील रामकृष्ण पाटील रघुनाथ पाटील छोटू पाटील लोटन पाटील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते,,
उपस्थितांचे आभार किशोर पाटील यांनी मानले
जोगलखेडे येथे स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना शाखेचे उद्घाटन
10 months ago
No Comments