बाप रे ! भिलाली येथे चोरट्यांनी एकाच दिवशी पाच बंद घरे फोडले; पारोळा पोलीसात गुन्हा दाखल

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भिलाली येथील ५ बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीचे दागिन्‍यांसह रोकड असा एकूण २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यासंदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पारोळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल रंगराव पाटील (वय-२२) रा. भिलाली ता. पारोळा जि. जळगाव यांच्या आजी बुधवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता जेवण करून झोपल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरातील लोखंडी पेटी घेऊन घराच्या मागे असलेल्या शेतात नेऊ तोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी गुरुवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. याबाबत चौकशी केली असता तर गावातीलच विशाल सूर्यकांत पाटील, लोटन तुळशीराम पाटील, रवींद्र साहेबराव पाटील, गावातील संत सोनगीर महाराज मंदिराची दानपेटी आणि शंकर बडगू पाटील सर्व रा. भिलाली ता. पारोळा यांच्याकडे देखील चोरी झाल्याचे उघड केला आले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या गावात धाव घेऊन पंचनामा केला. यात चोरट्यांनी एकूण सोन्याचे व चांदीचे दागिने यांसह एकूण २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी कुणाल पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुरुवार १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल करीत आहे.

Protected Content