मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल, येथे मोठ्या उत्साहाने व स्फूर्तीने साजरा करण्यात आला आनंद मिळावा. 21 डिसेंबर 2024, वार शनिवारला नियोजित असलेल्या आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेतर्फे मोठ्या उत्साहाने करण्यात आले. या आनंद मेळाव्यात इयत्ता चौथी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक जगताची व दैनंदिन व्यवहारिक उलाढालीची माहिती प्रत्येक्ष रूपाने घेता यावी. याकरिता विद्यार्थ्यांना शाळेतर्फे संधी उपलब्ध करून देण्यात आली.
वरील वर्गांच्या विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून जवळ जवळ शाळेमध्ये शंभरच्या वर विविध पदार्थांची दुकाने लावण्यात आली. यामध्ये सोयाबीन चिल्ली बिर्याणी, पुलाव राईस, खमंग ढोकळा, पचोरी, समोसा, आलू वडा, पावभाजी, रसगुल्ले, मिठाई, विविध प्रकारचे मसाले पापड, घरगुती बटाटा चिप्स, केळी चिप्स, चहा, कॉफी, मठ्ठा, विविध फळांच्या डिशेस, ज्यूस, पिकलेली बोरे, गोड केलेली बोरे, साबुदाणा, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, अशा असंख्य पदार्थांच्या दुकानांची मेजवानी शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत स्टॉल रूपाने दुकाने लावण्यात आली. या सर्व विभिन्न पदार्थांचा आस्वाद शाळेतील जवळ जवळ आठशे विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी, पालकांनी व आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घेतला तथा विद्यार्थ्यांचे व आयोजित कार्यक्रमाचे सर्वांकडून उस्फूर्तपणे कौतुक करण्यात आले.
बालपणापासून विद्यार्थ्यांना जीवनाचा सर्वांकष अनुभव घेता यावा हे उद्दिष्ट लक्षात ठेवून शाळेतील भावी पिढी सक्षम तथा नोकरी शोधणारी नसून व्यवसाय करणारी आणि व्यवसाय निर्माती म्हणून उदयास यावी व्यवहारिक ज्ञानाचे धडे विद्यार्थ्यांना बालपणापासून योग्य प्रकारे गिरवता यावे भारतीय उद्योग जगतात शाळे कडून फुल नाहीतर फुलाची पाकळी या स्वरूपात कार्य व्हावे हा या कार्यक्रमा मागचा मुख्य हेतू होता. या कार्यक्रमाला विशेष असे मार्गदर्शन व सहकार्य शाळेच्या सचिव मा. रक्षाताई खडसे केंद्रीय राज्यमंत्री, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांचे लाभले त्याबद्दल शाळेतर्फे त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक व्ही के वडस्कर तथा या कार्यक्रमाचे व्यवस्थापक, स्वप्निल सुधाकर चौधरी, अमोल सुतार यांच्या उपस्थितीत सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्प माळा अर्पण करून तथा श्रीफळ व रेबीन कापून या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक सतीश गायकवाड यांनी केले तर हा कार्यक्रम ध्येयाने प्रेरित असलेल्या शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, आमचे प्रिय विद्यार्थी, विद्यार्थिनी तथा आदरणीय पालकांच्या व शाळेचा अविभाज्य भाग असलेल्या चालकांच्या अथक प्रयत्नांतून यशस्वी झाला